loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड सार्वजनिक स्मशानभूमीच्या दहनस्थळांची तातडीने दुरुस्ती; नगराध्यक्ष माधवीताई बुटाला यांच्या सूचनेनंतर कामांना वेग

खेड (प्रतिनिधी) - खेड शहरातील चिपळूण नाका व कुवारसाई येथील सार्वजनिक स्मशानभूमीतील दहनस्थळे पूर्णपणे मोडकळीस आल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या अत्यंत तातडीच्या विषयाकडे प्रभागाचे नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर यांनी लेखी मागणीद्वारे लक्ष वेधले होते. तसेच अनेक नागरिकांनीही या समस्येबाबत प्रशासनाला वारंवार अवगत केले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मागणीची गंभीर दखल घेत नगराध्यक्ष माधवीताई बुटाला यांनी तात्काळ संबंधित विभागाला दहनस्थळांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्याच्या सूचना दिल्या. त्याअनुषंगाने चिपळूण नाका येथील दहनस्थळाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, कुवारसाई स्मशानभूमी येथील दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामांची प्रत्यक्ष पाहणी प्रभागाचे नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर यांनी करून काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg