loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत कोकण कला अकादमी स्थापनेची माजी जिल्हा अध्यक्ष सचिन वहाळकर यांची आग्रही मागणी

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेले सांस्कृतिक कार्य मंत्री नामदार आशिष शेलार यांनी जिल्हा भाजपा कार्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान माजी जिल्हा अध्यक्ष सचिन वहाळकर यांनी त्यांची भेट घेऊन कोकणातील विविध क्षेत्रातील कलाकारांना कायम स्वरुपी व्यासपीठ मिळण्यासाठी रत्नागिरी येथे स्वतंत्र कला अकादमी राज्य सरकारकडून सुरू करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली. रंगभूमी, संगीत, साहित्य, भारतीय नृत्यशैली, कोकणातील लोककला अशा विविध क्षेत्रात कोकणातील कलाकारांनी आपल्याकडे असलेल्या कौशल्याचा ठसा राज्य तसेच देश पातळीवर उमटवला आहे. परंतु यातील अनेकांना त्यात्या क्षेत्रात नाव मिळवण्यासाठी मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांचा आसरा घ्यावा लागतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यासाठी तिथे राहण्यापासून इतर सर्व गोष्टींसाठी मोठा संघर्षही करावा लागतो. कोकणात रत्नागिरीसारख्या ठिकाणी जर राज्य सरकारने प्रभादेवी येथे असलेल्या पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या धर्तीवर किंवा गोवा कला अकादमीच्या धर्तीवर कोकणासाठी स्वतंत्र कला अकादमी सुरू केली, तर तळ कोकणातील कलाकारांसाठी कायमस्वरूपी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध होईल. यातून कोकणातील सर्व क्षेत्रातील सांस्कृतिक चळवळीला मोठ्या प्रमाणात चालना मिळून त्याचा फायदा स्थानिक कलाकारांना मिळेल. यासाठी सांस्कृतिक मंत्री म्हणून आपण कोकण कला अकादमीची निर्मिती करून ती रत्नागिरी सारख्या शहरांत उभी करावी अशी मागणी सचिन वहाळकर यांनी आशिष शेलार यांच्या कडे केली.

टाईम्स स्पेशल

तसेच नागपूर, संभाजी नगर, मुबई येथे ज्या पद्धतीने राज्य सरकारने आर्ट व डिझाईन महाविद्यालये सुरू केली आहेत. त्याच धर्तीवर मुंबई विद्यापीठ उपकेंद्राच्या माध्यमातून अथवा स्वतंत्र पणे रत्नागिरी मध्ये आर्ट कॉलेज सुरू करण्यात यावे जेणेकरून इथल्या विविध क्षेत्रातील कलाकारांना आपल्या कला गुणांना अधिक विकसित करण्याची संधी मिळेल. यातून रोजगार निर्मिती पण होऊ शकेल. हि मागणीही माजी जिल्हा अध्यक्ष सचिन वहाळकर यांनी माननीय मंत्री महोदयांकडे केली. यावर सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून आपण निश्चितपणे या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन नामदार आशिष शेलार यांनी सचिन वहाळकर यांना दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg