loader
Breaking News
Breaking News
Foto

चिंचवली गोटलवाडीच्या डोंगराला मोठ्या भेगा; दरड कोसळण्याचा धोका, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

खेड (दिलीप देवळेकर) - खेड तालुक्यातील ग्रामपंचायत चिंचवली अंतर्गत गोटलवाडी येथील वस्तीलगत असलेल्या डोंगरामध्ये मोठ्या प्रमाणात भेगा आणि तडे पडल्याचे निदर्शनास आले आहे. सुमारे दीड ते दोन किलोमीटर लांबीपर्यंत डोंगराला भेगा पडल्यामुळे या परिसरात दरड कोसळण्याची भीती व्यक्त केली जात असून ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर डोंगरातील भेगा अधिक रुंदावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गोटलवाडीतील वस्तीला मोठा धोका निर्माण झाला असून, कोणत्याही क्षणी दरड कोसळून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या धोक्यामुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित महसूल, भूगर्भशास्त्र आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन डोंगराची पाहणी करावी, भेगांचे तांत्रिक मूल्यांकन करून संभाव्य धोका निश्चित करावा. तसेच आवश्यक असल्यास धोकादायक परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, सलग पडणाऱ्या पावसामुळे कोकणातील विविध भागांमध्ये भूस्खलन आणि दरड कोसळण्याच्या घटना घडत असताना गोटलवाडीतील ही परिस्थिती अत्यंत गंभीर मानली जात आहे. संभाव्य नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg