संगमेश्वर (सत्यवान विचारे) - महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने बँक राष्ट्रीयीकरणाच्या ५७ व्या वर्षानिमित्त तसेच ज्येष्ठ कामगार नेते कॉ. पी. के. मेनन यांच्या १०१ व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाणे (सांगवे) येथील सांदिपनी गुरुकुल परिसरात १५८ वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण करण्यात आला. या उपक्रमात बँकेचे अधिकारी, कर्मचारी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी वृक्षारोपणाबरोबरच शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सामाजिक उपक्रमही राबविण्यात आला. सांदिपनी गुरुकुल येथील १० अनाथ विद्यार्थ्यांना तसेच देवरुख येथील मातृमंदिर गोकुळ संस्थेअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या २० अनाथ मुलींना संघटनेच्या वतीने शालेय दप्तर (बॅग) व शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क असून समाजातील वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या संपूर्ण उपक्रमासाठी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र पुरस्कार सन्मानित आणि गरजूंना दिवस-रात्र मदतीसाठी धावून जाणारे युयुत्सु आर्ते यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमास बँकेचे शाखा व्यवस्थापक गौरव सिंग, प्रफुल अलूरवार, आशिष नागतोडे, अभिजित केणे, पायल नागतोडे, संघटनेचे कमिटी सदस्य हर्ष पवारे, वैभव देशमुख तसेच कसबा, संगमेश्वर, कुरधुंडा, कडवई, साखरपा आणि देवरुख शाखांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व यशस्वी आयोजन कॉ. विनोद कदम, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन तसेच अध्यक्ष, बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन, पुणे यांनी केले. सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून पर्यावरण संवर्धन, शिक्षणाचा प्रसार आणि वंचित घटकांप्रती संवेदनशीलता या त्रिसूत्रीवर आधारित हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश देत पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, तसेच समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रत्येकाने आपल्या परीने योगदान द्यावे, असे आवाहन केले. महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन केवळ कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठीच नव्हे, तर समाजहित आणि पर्यावरण संवर्धनासाठीही सातत्याने कार्यरत असल्याचे या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.