loader
Breaking News
Breaking News
Foto

मनसेच्या वतीने पालशेत विद्यालयातील इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव

वरवेली (गणेश किर्वे) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उप तालुकाध्यक्ष प्रसाद विखारे यांच्या वतीने पालशेत विद्यालयातील इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा नुकताच पालशेत विद्यालयात मनसे उप तालुका अध्यक्ष प्रसाद विखारे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. पालशेत विद्यालयाची विद्यार्थिनी गार्गी चंद्रकांत झिंबर हिने इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उज्वल यश प्राप्त करून गुहागर तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच अस्मि जितेंद्र पवार या विद्यार्थिनीने गुहागर तालुक्यात चतुर्थ क्रमांक प्राप्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी या दोन्ही विद्यार्थ्यांचं विशेष कौतुक मनसेच्या वतीने करण्यात आले. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपतालुकाध्यक्ष प्रसाद विखारे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.एम. बोरभट, विभाग प्रमुख एस.एम. सोनवणे, शिक्षक आर.डी. लांबोर, एस एस कणसे, माजी मुख्याध्यापक मनोज जोगळेकर आदींसह शिक्षक तसेच मनसे सैनिक उपस्थित होते. यावेळी प्रसाद विखारे यांनी गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक व पालक यांचे विशेष कौतुक केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg