loader
Breaking News
Breaking News
Foto

कै. अनिल म्हात्रे या युवकाचा करण्यात आला आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा

पनवेल :- कै. अनिल म्हात्रे या युवकाचा त्याच्या राहत्या गावात म्हणजेच (गोवठणे) येथे त्याच्या मृत्यूपश्चात त्याच्या नातेवाईक व मित्र परिवाराने आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. गेल्या वर्षी कै.अनिल शरद म्हात्रे या युवकाचा अवघ्या 32 व्या वर्षी अल्पशा आजाराने मृत्यू झाला. त्याच्या जाण्याने त्याच्या परिवारासहीत त्याच्या मित्रांना अतिशय दुःखदायक घटना होती. या त्याच्या दुःखातून अजूनही ते सावरले नाहीत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आजही त्यांना तो आपल्यातच असल्याचे वाटत असल्याने त्याचा आजचा वाढदिवस मित्रांनी गावातील मराठी शाळेत सर्व विद्यार्थ्यांना दप्तरे व वह्या, पुस्तकांचे वाटप केले. त्याचप्रमाणे वृक्षारोपण अशा प्रकारचे सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवून त्याच्या आठवणीची झाडे लावण्यात आली. हा उपक्रम संस्थान ग्रुप गोवठणे, हॅकर बॉईज, कॉक्रोज गँग, दर्दी आशिक ग्रुप या सर्व संस्थांनी विशेष परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल ग्रामस्थांनी तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी व कै.अनिल म्हात्रे याच्या कुटुंबियाने व मित्र परिवाराने कौतुक केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg