loader
Breaking News
Breaking News
Foto

इंडिया टुडेच्या सर्वेक्षण क्रमवारीत सलग नवव्यांदा राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा समावेश

देवरुख, (प्रतिनिधी)- इंडिया टुडे या प्रख्यात राष्ट्रीय मासिकातर्फे दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारी २०२६ मध्ये भारतातील शासकीय तसेच खाजगी अभियांत्रिकी असे एकूण २७५ महाविद्यालयांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा भारतातील सर्वोत्तम खाजगी महाविद्यालयांच्या क्रमवारीत सलग नवव्या वेळी स्थान प्राप्त केले आहे. या सर्वेक्षणानुसार राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्रात ३३ व्या क्रमांकावर असून मुंबई विद्यापीठात नवव्या क्रमांकावर मानांकित झाले आहे. कोकणातील केवळ दोनच अभियांत्रिकी महाविद्यालयांचा या राष्ट्रीय क्रमवारीत समावेश करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सर्वेमधील इन्फ्रास्ट्रक्चर अँड लिविंग एक्स्पीरिअन्स या निकषामध्ये राजेंद्र माने महाविद्यालयाने महाराष्ट्रात तसेच मुंबई विद्यापीठातहि दुसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच अकॅडेमीक एक्सलेन्स या निकषामध्ये महाराष्ट्रात बाविसावा तर मुंबई विद्यापीठात सातवा क्रमांक प्राप्त केला आहे. कोकणातून या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या महाविद्यालयांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर अँड लिविंग एक्स्पीरिअन्स, प्लेसमेंट व करिअर प्रोग्रेशन व ऍकॅडेमीक एक्सलेन्स या तीनही निकषांमध्ये माने अभियांत्रिकी महाविद्यालय पुन्हा एकदा सरस ठरले आहे. पुणे, मुंबई यासारख्या मोठ्या शहरांमधील महाविद्यालयांच्या तोडीचे दर्जेदार शिक्षण व सुविधा राजेंद्र माने सारख्या महाविद्यालयाने ग्रामीण भागात उपलब्ध करून दिल्याबद्दल अनेक पालकांनी समाधान व्यक्त केले असून अनेक विद्यार्थी स्थानिक पातळीवरील दर्जेदार उच्च शिक्षणाला व निसर्गरम्य कॅम्पसला पसंती देत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg