loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड रेल्वे स्थानकात दोन्ही प्लॅटफॉर्मवर शेड उभारून वसई-चिपळूण मेमु सुरू करण्याची मराठा क्रांती स्वराज्य संघटनेची मागणी - सदानंदराव भोसले

नवी मुंबई (प्रतिनिधी) - मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी खेड रेल्वे स्थानकावर दोन्ही प्लॅटफॉर्मवर पत्राची पूर्णपणे शेडचे काम त्वरित कोकण रेल्वे प्रशासनाने मंजुर करून त्याची अंमलबजावणी करावी तसेच वसई रोड वरून गणपती सण विचारात घेऊन वसई रोड चिपळूण मेमु सुरू करण्यात यावा अशी मागणी करत या करिता आपण लवकरच कोकण रेल्वे संचालक संतोष झा यांची भेट घेऊन या बाबत चर्चा करणार असल्याची माहिती पत्रकारांजवळ बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खेड रेल्वे स्थानकात सुमारे पाच तालुक्यातील हजारो प्रवासी रोज ये-जा करत असतात. खेड, दापोली, मंडणगड, पोलादपूर तालुक्यातील गुजरात येथील राहणारे ग्रामस्थ व महाबळेश्वर येथील काही खेड्यातील खेड तालुक्यातील सीमावर्ती भागातील खांदाट खोऱ्यातील अनेक खेड्यातील लोक हे खेड रेल्वे स्थानकात जात-येत असल्याने कोकण रेल्वे स्थानकामध्ये मोठे उत्पन्न देणारे हे रेल्वे स्थानक परिचित आहे.

टाईम्स स्पेशल

मात्र तेथे नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन कमी पडत असुन उन्हाळी पावसाळी हंगामात प्रवाशांची मोठी कुचंबना होते. खरं तर खेड रेल्वे स्थानकात सर्वच लांब पल्ल्याच्या गाड्या थांबणे आवश्यक होते. मात्र अ दूरदर्शी नेतृत्व व दिशाहीन लोक प्रतिनिधी यांच्यामुळे प्रवाशांची ससेहोलपट होत असल्याचे मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg