loader
Breaking News
Breaking News
Foto

शिक्षणप्रेमी ‘अभिजीत देवळेकर’ यांची भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीसपदी निवड

मंडणगड(प्रतिनिधी)- शिक्षणप्रेमी ‘अभिजीत देवळेकर’ यांची भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) अनुसूचित जाती मोर्चाच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. भाजपाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. या वेळी कोकण सहसंयोजक पदवीधर प्रकोष्ठ अजय दळवी, उत्तर रत्नागिरी अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष मंगेश मोहिते, भाजपा तालुका अध्यक्ष दत्ताजी महाडिक, उपाध्यक्ष विजय दुर्गवले, सरचिटणीस ऍड. सुशिल दळवी, यश मेहता, शहर अध्यक्ष आनंद नारकर, महिला तालुका मोर्चा अध्यक्षा श्रेया दळवीसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील पक्षसंघटनेत नवचैतन्य निर्माण झाले असून, देवळेकर यांच्यावर पक्षाच्या वाढीसाठी आणि अनुसूचित जातीच्या प्रश्नांवर काम करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे त्यांच्याकडे जनसंपर्क आणि संघटन कौशल्य आहे. या कौशल्याचा उपयोग आगामी काळात भाजप अनुसूचित जाती मोर्चाला अधिक बळकट करण्यासाठी आणि समाजातील विविध घटकांना पक्षाशी जोडण्यासाठी होईल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. देवळेकर यांच्या या निवडीबद्दल त्यांचे राजकीय वर्तुळातून आणि विविध सामाजिक संस्थांकडून अभिनंदन होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg