दापोली (प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, ओळगांवने शिष्यवृत्ती परीक्षेतील उज्ज्वल निकालाची परंपरा यंदाही कायम राखत पुन्हा एकदा तालुक्याचे नाव उंचावले आहे. सन २०२५-२६ शैक्षणिक वर्षातील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेच्या अन्वी अमित मांजरेकर हिने २५६ गुण मिळवत रत्नागिरी जिल्ह्यात द्वितीय तर दापोली तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे तिने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतही घवघवीत यश मिळवून शाळेच्या यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
याचबरोबर शाळेचीच विद्यार्थिनी आराध्या भूषण आग्रे हिने २०६ गुण मिळवत दापोली तालुक्यात १७ वा तसेच रत्नागिरी जिल्ह्यात १३५ वा क्रमांक मिळवून गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. या दोन्ही विद्यार्थिनींच्या यशामुळे ओळगांव शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. या यशामागे मुख्याध्यापक व मार्गदर्शक दीपक बेनेरे तसेच सहशिक्षिका सौ. अमृता कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींची जिद्द, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण परिश्रम यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या उल्लेखनीय यशाबद्दल यशस्वी विद्यार्थिनी, त्यांचे पालक, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद यांचे शाळा व्यवस्थापन समिती, ओळगांव विकास मंडळ, ग्रामस्थ (ओळगांव व मुंबई) तसेच महिला मंडळ यांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.