loader
Breaking News
Breaking News
Foto

​इन्सुली शाळा नंबर ५ चा शिष्यवृत्ती परीक्षेत १००% निकाल; दीपश्री सावंत जिल्हा गुणवत्ता यादीत ४२ वी

​सावंतवाडी (प्रतिनिधी): पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ (इयत्ता पाचवी) मध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली नंबर ५ या शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. परीक्षेस बसलेले दोन्ही विद्यार्थी पात्र ठरल्याने शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांनी सलग चौथ्या वर्षी शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवण्याचा बहुमान मिळवला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शाळेतील दिपश्री दिपेश सावंत हिने २२० गुण मिळवून ग्रामीण सर्वसाधारण जिल्हा गुणवत्ता यादीत ४२ वा क्रमांक पटकावला आहे, तर खुशबू सुनील सावंत हिने १८६ गुण मिळवून उत्कृष्ट यश संपादन केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक व मार्गदर्शक सुधीर गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्याध्यापक भास्कर माजगावकर आणि हंसराज गवळे यांचेही सहकार्य लाभले.

टाईम्स स्पेशल

​विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल इन्सुली केंद्रबल गटाचे केंद्रप्रमुख लक्ष्मीदास ठाकूर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपेश सावंत व सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg