loader
Breaking News
Breaking News
Foto

भगवा झेंडा आणि प्रभू श्रीरामांचा फोटो घेऊन गावागावात जाऊन सभा घेणार!

चिपळूण, : ‘अयोध्यतील राम मंदिरात चोरी झाली आहे. तब्बल १४०० कोटी रुपये चोरीला गेल्याचे कळते आहे. कोणी केली ही चोरी ? भाजपशी संबंधित संघटनांनीच हे पाप केले आहे. कलियुगातले सगळ्यात लुटारू हे लोक आहेत, यांचा खरा चेहरा समोर आणायची संधी रामाने आपल्याला दिली आहे. त्यामुळे गावागावात जाऊन यांचे पाप लोकांना सांगणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा घेवून मी मतदारसंघातील गावागावात जाऊन सभा घेणार असल्याची घोषणा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि गुहागरचे आ. भास्करशेठ जाधव यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एका वृत्त वाहिनीशी बोलताना आ. जाधव यांनी हे जाहीर केले. नीट पेपरफुटीनंतर आता राम मंदिरातील पैसे आणि मौल्यवान दागिन्यांच्या चोरीच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील रामरक्षा आंदोलनाची हाक देत केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर, नागपुरातील संघभूमीतही या मुद्द्यावरुन आंदोलन करण्याची भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राम मंदिरातील देणगी चोरीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर जळजळीत टीका केली आहे. यापूर्वी उद्धव ठाकरेंनीदेखील हिंदूत्त्ववादी संघटनांना राम मंदिरातील चोरीप्रकरणी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले होते.

टाईम्स स्पेशल

कलियुगातले सगळ्यात लुटारू हे लोक आहेत, यांचा खरा चेहरा समोर आणायची संधी रामाने आपल्याला दिली आहे. त्यामुळे गावागावात जाऊन यांचे पाप लोकांना सांगणे गरजेचे आहे. पक्षीय बॅनर न घेता रामाचा बॅनर आणि भगवा झेंडा घेऊन मतदार संघातील प्रत्येक भागात सभा घेणार असल्याची घोषणा आ. भास्कर जाधव यांनी केली. हे खरे हिंदुत्ववादी नाहीत, तर हे हिंदुत्वाचे मारेकरी आहेत, २०२९ ला राम यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात आमदार भास्कर जाधव यांनी सत्ताधारी भाजपावर केलाय. १४०० कोटी रुपयांची चोरी झाली. कोणी केली ही चोरी? काँग्रेस, आप, जनता दल ? ही चोरी दुसर्‍या तिसर्‍या कोणी केलेली नसून भाजपशी संबंधित असलेल्या संघटनांनीच केली आहे. हा विषय अजिबात सोडायचा नाही, देशात अनेकांनी उठाव करायला सुरुवात केली आहे, असे आ. भास्कर जाधव यांनी म्हटले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg