loader
Breaking News
Breaking News
Foto

वालावलकर रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया शिबिराची नाव नोंदणी सुरू, इ. एन.टी मोफत शस्त्रक्रिया शिबिर

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागातर्फे मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नाकाच्या हाडाचे, सायनसचे, कानाच्या पडद्याचे, कानाच्या हाडाचे, टॉन्सिल-एडीनाईडचे, अश्रू पिशवीचे, लाळ ग्रंथीचे तसेच थायरॉईडचे ऑपरेशन्स करण्यात येणार आहेत. या शिबिरासाठीची नाव नोंदणी वालावलकर रुग्णालयात सुरू आहे, तरी सर्व रुग्णांनी वालावलकर रुग्णालयाच्या इ.एन.टी विभागात प्राथमिक तपासणी करून नाव नोंदणी करून घ्यावी, असे आव्हान इ.एन. टी सर्जन डॉ. प्रतीक शहाणे यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या ठिकाणी" महात्मा फुले योजना, आयुष्यमान भारत योजना यासह विविध योजना व असे मोफत शस्त्रक्रिया शिबिर नेहमीच राबविण्यात येतात. गरीब व गरजू रुग्ण वालावलकर रुग्णालयात विवीध आरोग्य सेवेचा लाभ घेत आहेत. तरी सर्व कान-नाक-घशाचा त्रास असलेल्या गरजू रुग्णांनी या शिबिराच्या लाभ घ्यावा "असे आव्हान रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सुवर्णा पाटील यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg