खेड - खेड तालुक्यातील बोरघर आदिवासी (कातकरी) समाजाच्या कुटूंबाना दरवर्षी पूराच्या पाण्याचा फटका बसत असून कुटूंबांचे नुकसान होत असते. येथील साधारण ३१ कुटूंबांचे स्थलांतर करणे गरजेचे असून यासाठी शासन दरबारी पाठपुरावा चालू आहे. माहे जुलै २०२६ मध्ये अतिवृष्टीमुळे बोरघर आदिवासीवाडी येथील अनेक कुटूंबे पूरग्रस्त झालेली आहेत. येथील २० पूरग्रस्त कुटूंबांना तेजस्वी गलांडे, प्रकल्प अधिकारी, एका. आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जि. रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली व शासकीय माध्य. आश्रमशाळा कादवण व वेरळ यांच्यावतीने मदतकार्य म्हणून दिनांक १४/०७/२०२६ रोजी अन्नधान्य संच ज्यात तांदूळ, डाळी, कडधान्य, गोडेतेल, साखर, चहा, मीठ यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी खेड तहसिलदार कार्यालयकडूनही या पूरग्रस्त कुटूंबांना अतिरिक्त शिधावाटप करण्यात आले.
याप्रसंगी तहसिलदार कार्यालयाचेवतीने मंडळ अधिकारी उमाकांत देशमुख, खेड मंडळ अधिकारी संतोष उतेकर, बोरघरचे माजी सरपंच उदय बोरकर, बोरघर तलाठी सुरेश मुंढे, बोरघर पोलीस पाटील प्रफुल्ल गोवळकर, बोरघ शिधावाटप केंद्र सहाय्यक भावेश वानरकर, बोरघर ग्रामपंचायत कर्मचारी अक्षय मयेकर आदी उपस्थित होते. त्याचबरोबर, कादवण आश्रमशाळा मुख्याध्यापक सदानंद चव्हाण, वेरळ आश्रमशाळा मुख्याध्यापक मदन खामकर, आश्रमशाळा अधीक्षक वेरळ सचिन शेलार, आश्रमशाळा अधीक्षक कादवण रामचंद्र भोसले व पूरग्रस्त आदिवासी कुटूंबातील प्रतिनिधी उपस्थित होते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.