loader
Breaking News
Breaking News
Foto

स्मार्ट व्हिलेज प्रकल्पात वैभववाडीतील २१ गावांचा समावेश; आढावा बैठक संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) - वैभववाडी तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील 21 गावांमध्ये स्मार्ट व्हिलेज प्रकल्प राबविण्यात येत असून या प्रकल्पामुळे गावांच्या विकासाला नवीन झळाळी मिळणार आहे. संबंधित यंत्रणांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प यशस्वी करणे आवश्यक आहे. एकजुटीने योग्य नियोजन व डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करून तालुक्यातील ही 21 गावे अधिक स्मार्ट बनवूया, असे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी केले. स्मार्ट व्हिलेज इंटेलिजन्स प्रकल्पांतर्गत वैभववाडी तालुक्यातील 21 गावांचा समावेश केल्याबद्दल त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले. या निमित्ताने वैभववाडी पंचायत समिती येथे स्मार्ट व्हिलेज प्रकल्पाची आढावा बैठक पार पडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उपसभापती साची कोलते, जिल्हा परिषद सदस्य रिद्धी सुतार, पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे, मंगेश लोके, सुवर्णा संसारे, जयेंद्र रावराणे, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी माने, विस्तार अधिकारी प्रकाश अडुळकर तसेच सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सिद्धेश रावराणे म्हणाले की, या प्रकल्पांमध्ये शेती, आरोग्य, शिक्षण,पाणीपुरवठा, वीज व ऊर्जा व्यवस्थापन या क्षेत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि विविध डिजिटल साधनांचा वापर करून ग्राम विकासाला गती दिली जाईल. ड्रोन व सेंसर आधारित शेती, कमी खर्चात आधुनिक शेती पद्धती, स्मार्ट क्लासरूम, ई-लर्निंग सुविधा, कौशल्य विकास व करियर मार्गदर्शन यांचाही या प्रकल्पात समावेश असेल.

टाईम्स स्पेशल

याशिवाय गावकऱ्यांना विविध डिजिटल सेवा व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून प्रकल्प यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रामस्थांनी या उपक्रमाचा पुरेपूर लाभ घेऊन आपले गाव स्वयंपूर्ण व आधुनिक बनवण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आव्हानही त्यांनी केले. यावेळी जयेंद्र रावराणे, विशाल चौगुले, शासकीय तंत्रनिकेतन मालवणचे प्राचार्य डॉ दिलीप घायतिडक तसेच मंगेश लोके यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस तालुक्यातील 21 गावांचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg