loader
Breaking News
Breaking News
Foto

गढूळ पाण्यावरून माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग आक्रमक; नगरपरिषदेला मोर्चाचा इशारा

सावंतवाडी : नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांना गढूळ पाणी आल्याने ते चांगलेच आक्रमक झाले. लोकांच्या जीवाशी का खेळता ? जर हानी झाली तर जबाबदार कोण ? असा सवाल त्यांनी केला. मुख्याधिकारी यांना भेटण्यासाठी ते गढूळ पाणी घेऊन आले होते. मात्र, ते अनुपस्थित असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी परिस्थिती न सुधारल्यास नगरपरिषदेवर मोर्चा घेऊन येणार असा इशारा वारंग यांनी दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी प्रशासकीय अधिकारी वैभवकुमार अंधारे यांना याबाबत जाब विचारला. गढूळ पाणी लोकांना का सोडलं जात ? असा सवाल केला. यावेळी अधिकारी अंधारे यांनी पाईपलाईन लिकेज असल्याने असा प्रकार घडला असल्याचे सांगत आजच्या दिवसात दुरूस्ती करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी आक्रमक झालेल्या वारंग यांनी जर हे पाणी ग्रहण करून लहान मुलांसह नागरिकांच्या तब्येती बिघडल्या तर जबाबदार कोण असा सवाल करत तात्काळ कार्यवाही न झाल्यास नगरपरिषदेवर मोर्चा घेऊन येणार असा इशारा दिला.

टाईम्स स्पेशल

तर अशोक पवार यांनी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार असा सवाल अधिकाऱ्यांना केला. यावेळी संबंधित कंपनीकडून भरपाई केली जाईल असं उत्तर अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, सत्यजित धारणकर, अशोक पवार आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg