वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील जामसुत येथील सर्वोदय शिक्षण मंडळ संचलित सरस्वती विद्यामंदिर, जामसुत येथे सन २०२६ च्या एस.एस.सी. परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या इयत्ता दहावीच्या प्रथम पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, प्रेरणादायी मार्गदर्शन आणि विद्यालयाच्या उज्ज्वल वाटचालीचा आढावा यामुळे कार्यक्रम विशेष ठरला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष किशोरभाई साळवी होते. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा उद्योजक मंगेश कोलथरकर यांनी नेहमीप्रमाणे प्रथम पाच गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक प्रदान करून गुणवंतांचा गौरव केला.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य ऋचा माने, निवृत्त असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस अनिल माने, यांचे वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विचार मंचावर पंचायत समिती शिक्षण विभागाच्या केंद्रप्रमुख मीनाक्षी पवार, जिल्हा परिषद सदस्या अपूर्वा बारगोडे, माजी सरपंच महेश जामसुतकर, नृत्य कलाकार व टी. व्ही. सिरीयलच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री बालकलाकार मानवी कोलथरकर, रोहन साळवी, सामाजिक कार्यकर्ते अनिल घाडे तसेच विद्यालयाचे माजी कर्मचारी अनंत कुंभार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान शिक्षक कदम यांनी केले. जिल्हा परिषद सदस्य अपूर्वा बारगोडे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मनोगतातून विद्यार्थ्यांना वैयक्तिक अनुभवांच्या आधारे प्रेरणा दिली.
तसेच जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा लाभ विद्यालयाला मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. महेश जामसुतकर यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोपात किशोरभाई साळवी यांनी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. तसेच विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कायम खंबीरपणे पाठीशी असल्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दोलतडे यांनी केले तर लाड यांनी आभार मानले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.