loader
Breaking News
Breaking News
Foto

राजकारणापलीकडील संवेदनशीलतेचा आदर्श; काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबू गवस यांची हत्तीग्रस्त शेतकऱ्यांना भेट

तिलारी | प्रतिनिधी :दोडामार्ग तालुक्यातील पाळये येथे नुकत्याच झालेल्या हत्तीच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबू गवस यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. विशेष म्हणजे, नुकसानग्रस्त सूर्याजी झेंडे आणि विलास समर्थ हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतानाही बाबू गवस यांनी कोणताही राजकीय भेदभाव न करता त्यांच्या घरी जाऊन धीर दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हत्तीच्या हल्ल्यामुळे झालेल्या शेती व मालमत्तेच्या नुकसानीची पाहणी करताना गवस यांनी संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच प्रशासनाने तातडीने पंचनामा करून योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अनपेक्षितपणे विरोधी पक्षाच्या नेत्याने आपली विचारपूस करण्यासाठी घरी येत आधार दिल्याने सूर्याजी झेंडे व विलास समर्थ भावूक झाले. संकटाच्या प्रसंगी राजकीय मतभेद बाजूला ठेवून माणुसकीच्या भावनेतून दिलेला हा आधार त्यांच्यासाठी दिलासादायक ठरला.

टाइम्स स्पेशल

संकटाच्या काळात राजकारणापेक्षा माणुसकी आणि संवेदनशीलता अधिक महत्त्वाची असते, याचा प्रत्यय बाबू गवस यांच्या या कृतीतून आल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली. त्यांच्या या भेटीची तालुक्यात सर्वत्र सकारात्मक चर्चा होत असून, सामाजिक बांधिलकी आणि लोकांप्रती असलेली संवेदनशीलता याचे हे उदाहरण असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg