loader
Breaking News
Breaking News
Foto

कावजीवाडी दरड दुर्घटना : आपदग्रस्त कातकरी कुटुंबांना प्रशासनाचा मदतीचा हात

पेण : तालुक्यातील कावजीवाडी (निधवली) येथे दरड कोसळून बाधित झालेल्या पाच कातकरी कुटुंबांना जिल्हा प्रशासनाने तातडीची मदत उपलब्ध करून दिली आहे.जखमींवर त्वरित उपचार सुरू असून, सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.आपदग्रस्तांना आठ दिवसांचा धान्यसाठा, तसेच तात्पुरत्या प्रकाशासाठी दोन सौर दिवे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठीही तातडीने कार्यवाही सुरू आहे. पाहणीदरम्यान काही नागरिकांकडे आधारकार्ड, मतदार नोंदणी व दिव्यांग प्रमाणपत्र नसल्याचे निदर्शनास आले. संबंधित शासकीय कागदपत्रे व योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आपदग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत देण्याबरोबरच त्यांना विविध शासकीय योजनांशी जोडण्यासाठी प्रशासन समन्वयाने कार्यरत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

अद्याप नसलेले आधार कार्ड, मतदान कार्ड आदिवासींना देण्यात येणार

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg