loader
Breaking News
Breaking News
Foto

दहिवली दुर्घटना: बाधितांना १००% मदत; पुनर्वसनासाठी नवा आराखडा; महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे आश्वासन

रत्नागिरी- दहिवली येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज तातडीने दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी मनुज जिंदल हे देखील उपस्थित होते. या दुर्घटनेमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल आणि त्यांचे पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन राज्यमंत्र्यांनी दिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​पत्रकारांशी बोलताना राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, "संबंधित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या आमचे मुख्य प्राधान्य ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढणे हेच आहे. हा संपूर्ण भाग सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने संध्याकाळनंतर प्रचंड पाऊस आणि अंधारामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी आहेत. मात्र, तरीही एनडीआरएफचे ३० जवान दुर्घटनास्थळी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. बचावकार्यासाठी आणलेली पोकलेन मशीनही तिथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे काहीशी घसरली व अडकली आहे, परंतु आमचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत."

टाइम्स स्पेशल

​रत्नागिरी जिल्ह्यातील संवेदनशील आणि धोकादायक गावांच्या स्थलांतराबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले, "वर्षभरापूर्वी या संदर्भात बैठक घेतली होती. संपूर्ण जिल्ह्यात जिथे अशा दुर्घटना घडण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणांचा शोध घेऊन आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पुनर्वसनासाठी शासकीय किंवा खासगी जमीन संपादित करून ग्रामस्थांसमोर प्रस्ताव ठेवण्यात येईल. जोपर्यंत जागा उपलब्ध होत नाही तोपर्यंत स्थलांतर शक्य नाही, म्हणूनच जिल्ह्यासाठी एक नवीन आराखडा तयार केला जात असून, धोक्याच्या ठिकाणच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे."

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg