संगमेश्वर (सत्यवान विचारे) : राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री डॉ. आशिष शेलार यांनी बुधवारी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यादरम्यान संगमेश्वर कसबा येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रस्तावित स्मारक स्थळाची पाहणी केली. यावेळी स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी बोलताना डॉ. शेलार म्हणाले, "धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. भाजपचे आमदार प्रमोद जठार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. स्मारकाच्या प्रस्तावित जागेचा आढावा घेण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी मी येथे आलो आहे." दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत विविध राजकीय विषयांवरही भाष्य केले.
जयंत पाटील यांच्या 'वर्षा' निवासस्थानी झालेल्या भेटीबाबत विचारले असता ते म्हणाले, "जयंत पाटील वर्षावर गेले असतील तर त्यात गैर काय? ते माजी मंत्री, वरिष्ठ नेते आणि आमदार आहेत. मुख्यमंत्री मनाने मोठे आहेत. कामाच्या आवश्यकतेनुसार ते सर्वांना भेटतात. त्यामुळे त्या भेटीत नवीन असे काही नाही." भास्कर जाधव यांच्या कार्यालयाला दिलेल्या भेटीबाबत त्यांनी सांगितले, "भास्कर जाधव यांचा निरोप मला आला होता. त्यांच्या कार्यालयापासून दोन गाळे सोडून भाजपचे कार्यालय आहे. तुमचा सत्कार करायचा आहे, असा निरोप आला होता. आम्ही सर्व कोकणातील नेते आहोत. त्यामुळे त्यांच्या कार्यालयात शुभेच्छा स्वीकारण्यासाठी गेलो."शरद पवार यांच्या डिलिमिटेशन विधेयकावरील भूमिकेबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, "त्यांची भूमिका काय आहे हे मला माहिती नाही. मात्र हे विधेयक आले आणि त्याला जो कोणी समर्थन देईल, त्याचे आम्ही निश्चित स्वागत करू." सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांच्या एकाच वेळी 'वर्षा'वरील उपस्थितीबाबत ते म्हणाले, "हा चांगला योगायोग आहे. असे योगायोग सातत्याने घडोत."
"नवनाथ बंग यांनी व्यक्त केलेली शंका योग्य आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाविकास आघाडीने या योजनेत काही अवैध अर्ज घुसवले आहेत का, याची सरकारने चौकशी करावी," अशी मागणी त्यांनी केली. संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना डॉ. शेलार म्हणाले, "तुमच्या पक्षाने माता-भगिनींसाठी एक तरी योजना आणली का? संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना महिला विरोधी आहे. लाडक्या बहिणींना लाभ मिळत असल्यामुळे ते विरोध करत आहेत. ते लाडकी बहीण योजनेलाच नव्हे तर महिलांच्या ५० टक्के राजकीय आरक्षणालाही विरोध करत आहेत." भास्कर जाधव यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी, "भास्कररावांचा अभ्यास कच्चा आहे. त्यांना गैर, अवास्तव आणि बेजबाबदार विधाने करण्याची सवय झाली आहे," असा पलटवार केला. अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत ते म्हणाले, "ही चांगली गोष्ट आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे खासदार प्रखर हिंदुत्ववादी आणि राष्ट्रभक्त अमित शहा यांची भेट घेत आहेत, याचा आम्हाला आनंद आहे." यावेळी आमदार प्रमोद जठार, किरण सामंत, माजी आमदार डॉ. नातू, सहदेव बेटकर, राजेंद्र महाडिक, प्रमोद अधटराव, प्रशांत यादव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्मारकाच्या नियोजनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन मंत्र्यांनी आवश्यक सूचना दिल्या.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.