मंडणगड (प्रतिनिधी) - शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनवाढ साध्य करण्यासाठी मंडणगड तालुक्यातील म्हारवडा नजीक रानपाल येथे माहू गावातील प्रगतिशील शेतकरी दिनकर लक्ष्मण हुंबरे यांनी सगुणा राईस तंत्रज्ञान पद्धतीचा अवलंब करत आपल्या शेतात दीड एकरवर एसआरटीचा पहिलाच प्रयोग केला आहे. आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर, नियोजनबद्ध मशागत आणि वैज्ञानिक शेतीच्या माध्यमातून त्यांनी इतर शेतकर्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
यावर्षी त्यांनी प्रथमच एसआरटी (सगुणा राईस टेक्नॉलॉजी) पद्धतीने भात लागवडीचा निर्णय घेतला. या पद्धतीसाठी सर्वप्रथम शेतात नियोजनबद्ध वाफे तयार करण्यात आले. त्यानंतर ३० मे रोजी संपूर्ण कुटुंबाच्या सहभागातून दीड एकर क्षेत्रावर रत्नागिरी-८ या सुधारित भात बियाण्याची पेरणी करण्यात आली. पेरणीनंतर पहिल्या पावसात उगवणार्या गोल गवतासह तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तणनाशकाची फवारणी करण्यात आली. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात पिकाची वाढ अधिक जोमाने होण्यास मदत झाली. सध्या शेतात खत व्यवस्थापनाचे काम सुरू असून पिकाच्या प्रत्येक टप्प्यावर वैज्ञानिक पद्धतीने नियोजन केले जात आहे. एसआरटी पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहणे, पाण्याची बचत होणे, मशागतीचा खर्च कमी होणे आणि उत्पादनात वाढ होणे अपेक्षित असल्याचे दिनकर हुंबरे यांनी सांगितले. शेतीत सातत्याने नवनवीन प्रयोग करण्याची वृत्ती आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा प्रभावी वापर यामुळे परिसरातील अनेक शेतकरी त्यांच्या शेताला भेट देऊन एसआरटी पद्धतीची माहिती घेत आहेत. या प्रयोगाला यश मिळाल्यास मनुष्यबळाची कमतरता, असणार्या तालुक्यातील भातशेतीसाठी ही पद्धत दिशादर्शक ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.