loader
Breaking News
Breaking News
Foto

जगबुडी नदीने पुन्हा ओलांडली इशारा पातळी; खेड शहरावर तिसऱ्यांदा पुराचे संकट, मटण-मच्छी मार्केट पाण्याखाली

खेड (!दिलीप देवळेकर ) : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरावर पुन्हा एकदा पुराचे संकट घोंगावत आहे. मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली असून नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. जगबुडी नदीची इशारा पातळी ५ मीटर तर धोक्याची पातळी ७ मीटर आहे. सध्या नदी ५.७० मीटर पातळीवरून वाहत असून पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नदीच्या वाढत्या पाण्यामुळे खेड शहरात पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली असून मटण-मच्छी मार्केट परिसरातील अनेक दुकाने पाण्याखाली गेली आहेत. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या अवघ्या पंधरा दिवसांत तिसऱ्यांदा खेड शहरावर पुराचे संकट ओढावले आहे. त्यामुळे व्यापारी, नागरिक आणि नदीकाठच्या भागातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg