loader
Breaking News
Breaking News
Foto

टाइम्स इफेक्ट ; दोडामार्ग–तिलारी रस्त्यावरील कामाला पुन्हा वेग

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग–तिलारी मार्गावरील धोकादायक व चिखलमय रस्त्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी दोडामार्ग तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष बाबू गवस यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेल्या "सावधान, यमदूत आपली वाट बघत आहे..!" या अनोख्या फलकाची चर्चा होत असतानाच, आता संबंधित ठिकाणी रस्त्याच्या कामाला पुन्हा सुरुवात झाल्याचे चित्र दिसून आले आहे. या विषयावर रत्नागिरी टाइम्स यांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर संबंधित यंत्रणा आणि ठेकेदारांकडून हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे. रस्त्यावर जेसीबी, वाहने आणि कामगार दाखल झाल्याने रस्ता दुरुस्ती व सुधारणा कामाला वेग आल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काँग्रेसने उभारलेल्या फलकातून ठेकेदार, पोटठेकेदार आणि संबंधित यंत्रणांच्या कामकाजावर उपरोधिक टीका करत नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला होता. या आंदोलनामुळे आणि माध्यमांनी सातत्याने दिलेल्या प्रसिद्धीमुळे प्रशासनाने दखल घेतल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. मात्र, केवळ काम सुरू करणे पुरेसे नसून दर्जेदार, सुरक्षित आणि पावसाळ्यातही टिकणारा रस्ता नागरिकांना मिळावा, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. तसेच सुरू झालेले काम गुणवत्तापूर्ण पद्धतीने व वेळेत पूर्ण व्हावे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg