loader
Breaking News
Breaking News
Foto

बसमध्ये विद्यार्थीनीचा विनयभंग; बस कंडक्टरवर गुन्हा दाखल

दापोली (वार्ताहर) : दापोली बस स्थानकातून सुटलेल्या बसमधून प्रवास करणाऱ्या एका 17 वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी एस्टीच्या कंडक्टर विरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार (४ जुलै) सायंकाळी सुमारे ४ वाजता दापोली बस स्थानकातून सुटलेल्या दापोली टांगर मुगीज या बसमधून एक 17 वर्षीय विद्यार्थीनी प्रवास करत होती. या विद्यार्थीनीच्या शेजारी बसलेली एक मुलगी तिचे गाव आल्यावर या बसमधून उतरल्यावर या विद्यार्थीनी जवळ या बसचा कंडक्टर पुंडलिक शिवाजी केंद्रे येऊन बसला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रवासादरम्यान या कंडक्टरने या विद्यार्थीनीला तू कुठे उतरणार आहेस असे विचारले. त्यानंतर त्याने वारंवार तीला स्पर्श केला तेव्हा तीने त्याला दुसरीकडे जाऊन बसण्यासाठी सांगितले. तरीही तो ऐकला नाही म्हणून ती विद्यार्थीनी त्या सीटवरून उठून दुसरीकडे जाऊन बसली. त्यानंतर हा कंडक्टर पुन्हा तिच्या शेजारी येऊन बसला व त्याने या विद्यार्थीनीला अश्लील हेतूने स्पर्श केल्याचे तीने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संशयित कंडक्टर पुंडलिक शिवाजी केंद्रे (वय 35) याचे विरोधात लैंगिक अपराधा पासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसार तसेच भारतीत न्याय संहितेच्या कलम 75 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक ज्योती चव्हाण करत आहेत. दरम्यान कंडक्टर केंद्रे याला अटक करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg