loader
Breaking News
Breaking News
Foto

पोलादपूर कोतवाल रस्त्यावर चिखल असल्यामुळे एस टी बस कोतवाल खुर्द येथे घसरली ,धोका टळला

पोलादपूर धनराज गोपाळ पोलादपूर तालुक्यातील गेल्या काही दिवसात झालेल्या नैसर्गिक आपत्ती मुळे ग्रामीण भागात जाणाऱ्या अनेक मार्गवर माती आणि चिखल आल्याने रस्ते वरून वाहने घसरत आल्याचे वास्तवादी चित्र आज कोतवाल एसटी बस घसरल्या नंतर पहावयास मिळाले. पोलादपूर कोतवाल रस्त्यावर चिखल असल्यामुळे पोलादपूर वरून सुटणारी ३:४५ ची कोतवाल गाडी कोतवाल खुर्द येथे घसरली सदरची बस थोडक्यात बचावली कोणती ही जिवीत हानी झाली नाही ही बस पुलाच रोलिंग ला धडकल्याने शेतात पलटी होता होता वाचली आहे चालक दराडे यांच्या प्रसंगावधाणामुळे मोठा अनर्थ टळला आहे सुदैवाने बसमध्ये वाहक चालक व अन्य दोन प्रवासी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेची माहिती समजतात सभापती अविनाश शिंदे यांनी महाड आगार प्रमुख फुलपगारे यांच्याशी संपर्क साधून तात्काळ जेसीबी उपलब्ध करून दिल्याने गाडी बाहेर काढण्यात उशिरा यश मिळाले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg