loader
Breaking News
Breaking News
Foto

मनसेकडून स्मार्ट मीटर बसविण्याला विरोध; महावितरणला निवेदन

वेळणेश्वर (उमेश शिंदे) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर विधानसभा अध्यक्ष विनोद जानवळकर यांनी महावितरणच्या शाखा अभियंत्यांना निवेदन देत तालुक्यात सुरू असलेले स्मार्ट मीटर बसविण्याचे काम तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. निवेदनात स्मार्ट मीटर बसविण्याबाबत नागरिकांमध्ये नाराजी असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनीतून गेलेले वीज खांब व वीज वाहिन्यांचे मोबदले अद्याप मिळाले नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तालुक्यातील स्मार्ट मीटर बसविण्याचे काम तात्काळ थांबवावे, नागरिकांवर स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये, जमिनीतून गेलेल्या वीज पोल व वीज वाहिन्यांचा प्रलंबित मोबदला नियमांनुसार तातडीने द्यावा, प्रलंबित मोबदल्याची सर्व प्रकरणे निश्चित कालमर्यादेत निकाली काढावीत. या मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनतेच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष विनोद गणेश जानवळकर, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष प्रथमेश रायकर, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष राहुल जाधव उपतालुका अध्यक्ष सोपनिल जाधव, प्रसाद विखारे, उपविभाग अध्यक्ष विश्वजीत पोद्दार, महेश शिगवण, विवेक जानवळकर, राहुल रहाटे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg