loader
Breaking News
Breaking News
Foto

सोनम वांगचूक यांचे रुग्णालयातही उपोषण आजचा मोर्चा निघणारंच, कॉक्रोच पार्टीचा निर्धार

नवी दिल्ली - पोलिसांनी बळजबरीने रुग्णालयात दाखल केल्यानंतरही सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचे उपोषण सुरूच आहे. उपोषणाच्या २२ व्या दिवशीही त्यांनी कोणतेही उपचार घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान , ठरल्याप्रमाणे सोमवारी कॉक्रोच जनता पार्टीने संसदेवर मोर्चा नेण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. पोलीस प्रशासनाने मोर्चाला परवानगी नाकारली आहे. प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मोर्चामध्ये सोनम वांगचूक यांच्या पत्नी सहभागी होणार आहेत. दरम्यान, शनिवारी सकाळी सोनम वांगचूक यांना जबरदस्तीने पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांनी उपोषण सोडलेले नाही. रविवारी त्यांच्या उपोषणाचा २२ वा दिवस होता. ओआरएस किंवा सलाईन अथवा कोणतेही औषध त्यांनी घेतलेले नाही. सोमवारचा मोर्चा यशस्वी करा ऐवढेच आवाहन त्यांनी रुग्णालयातून केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान सोमवारच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या मोर्चाला पोलिसांनी कारवाई नाकारली आहे. जंतरमंतरवरून हा मोर्चा संसद भवनावर नेण्यात येणार आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्याने २२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांनी राजानामा द्यावा या मागणीसाठी हा मोर्चा असणार आहे. या मोर्च्याची माहिती आम्ही खुप आधीच पोलिसांना दिली होती, असे कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रवक्त्या वैष्णवी गौर यांनी सांगितले. सोनम वांगचूक यांना ताब्यात घेण्याचा आदेश दिल्ली पोलिसांना शुक्रवारी मध्यरात्री देण्यात आला. त्यानंतर पुर्णपणे नियोजन करण्यात आले. रात्री पोलिसांनी एक रंगीत तालीमही केली होती, अशी माहिती हाती येते आहे. मध्यरात्री दीड वाजता ही तालीम करण्यात आली. या कारवाईचे व्हिडिओ प्रसारित होवू नये यासाठी जॅमर बसविण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. शनिवारी पहाटे ५ वा. पोलीस जंतरमंतरवर पोहचले होते. ७ वा. च्या सुमारास त्यांनी उपोषणकर्त्या सोनम वांगचूक यांना जबरदस्तीने ताब्यात घेतले.

टाईम्स स्पेशल

काही साध्या वेशातील पोलिसांनी पांढर्‍या रंगाची चादर त्यासाठी वापरली कारण त्यांना ताब्यात घेतानाचे चित्रीकरण होवू द्यायचे नव्हते. दरम्यान, ठरल्याप्रमाणे २० जुलै ला संसदेवर मोर्चा निघेल. त्या कार्यक्रमास कोणताही बदल नाही. पोलिसांना जितका विरोध करायचा तेव्हढा विरोध करू दे, आम्ही डगमगणार नाही, असे अभिजीत दिपके यांनी जाहीर केले आहे. या मोर्चात सोनम वांगचूक यांच्या पत्नी सहभागी होणार आहेत. अन्य काही सामाजिक कार्यकर्तेदेखील मोर्चात सहभागी होतील. जंतरमंतरवर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. १०० हून अधिक आरएएफचे जवान तैनात करण्यात आले आहे. मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg