संगमेश्वर (प्रतिनिधी) - संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील असावी नदीतील गाळ उपसा पहाणी सिंधूरत्न योजनेचे उपाध्यक्ष माजी आमदार डॉ.विनय नातू यांनी केली. पुढील वर्षीच्या गाळ उपशासाठी महत्वपूर्ण सूचना व मार्गदर्शन करून ग्रामपंचायत धामणीच्या जलपर्यटन व जलक्रीडा केंद्र सुरू करण्यासाठी धामणी ग्रामपंचायतीने दिलेल्या प्रस्तावाबाबत सकारात्मक तयारी दर्शवून त्यासाठी आवश्यक पूर्तता करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. केवळ गाळ उपसा करून न थांबता पर्यटनाच्या विविध योजनातून जलपर्यटन जलक्रीडा यासारख्या योजनातून विकासाला, रोजगाराला नक्कीच चालना मिळेल, असा मार्गदर्शनपर विश्वास उपस्थितांसमोर व्यक्त केला.
आपल्या प्रत्येक गावातील जैवविविधता ,यांचा योग्य प्रकारे अभ्यास करून गावागावातील वैशिष्ट्ये जाणून घेता येऊ शकतात. ही वैशिष्ट्ये पर्यटनासाठी फायदेशीर ठरतात. पर्यटन क्षेत्रात येणाऱ्या अनेक गोष्टी, हॉटेल, लॉजिंग, होम स्टे, निवास केंद्र, चहा सेंटर तसेच गावागावात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून आकर्षित वाटणारे उत्पादन तयार केल्यास ही सुद्धा पूरक गोष्ट होऊ शकते. या सदिच्छा भेटी दरम्यान डॉ.नातू यांची सिंधूरत्न योजना उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी श्रद्धा हॉटेल मालक प्रभाकर घाणेकर, माजी सरपंच कीर्तनकार व व्याख्याते श्रीवास पेंडसे, माजी पोलीस पाटील हरिश्चंद्र गुरव, माजी सरपंच व समाजसेवक गौतम कांबळे, सेवाभावी दिगंबर लिंगायत, समीर कांबळे, प्रणव वाकणकर, प्रथमेश घाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.