loader
Breaking News
Breaking News
Foto

रानवी येथील गेली २५ वर्षे बंद असलेल्या"निरामय रुग्णालयाचे"'चे लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार, आमदार प्रमोद जठार यांचे शुभ संकेत

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील रानवी येथील गेली २५ वर्षे बंद अवस्थेतील निरामय रुग्णालयाच्या उद्धारासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने बंद रुग्णालयाच्या पाहणीसाठी आलो आहे. हे रुग्णालय सुरू करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रसाद लाड यांच्यावर सोपवली आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या निरामय हॉस्पिटलचे उद्घाटन होईल, असे शुभ संकेत आमदार प्रमोद जठार यांनी मंगळवारी येथे दिले. आमदार जठार यांनी मंगळवारी गुहागर तालुक्यातील रानवी येथील बहुचर्चित बंद अवस्थेत असलेल्या निरामय रुग्णालयाची पाहणी केली. यानंतर बोलताना ते म्हणाले की, हे एक मोठं पाऊल उचललं जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड यांनी सांगितल्याप्रमाणे आज आपण या निरामय रुग्णालयाची पाहणी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या रुग्णालयाची पाहणी करून झालेले नुकसान आणि यासाठी काय खर्च येईल याची माहिती आपण त्यांना देणार आहोत. सदर रुग्णालय दाभोळ पॉवर कॉर्पोरेशन आणि एन्रॉन यांच्यामध्ये अडकलेले आहे. आज येथील जनतेला या रुग्णालयाची नितांत गरज आहे. निरामय पुन्हा सुरू व्हावे अशी आपणा सर्वांची तसेच माजी आमदार डॉ. विनय नातू यांची इच्छा आहे. यामुळे त्यांच्या स्वप्नांना नक्कीच दिशा मिळेल. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त या रुग्णालयाच्या उद्धाराचे काम पुन्हा सुरू होईल व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या रुग्णालयाचे उद्घाटन होईल, असेही जठार यांनी यावेळी सांगितले.

टाईम्स स्पेशल

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा उपाध्यक्ष अजित साळवी, जिल्हा सरचिटणीस व उपसभापती नीलेश सुर्वे, जिल्हा सरचिटणीस जालगाव ग्रामपंचायत सरपंच अक्षय फाटक, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संकल्प अवेरे, माजी सरपंच यशवंत बाईत, तालुका सरचिटणीस सचिन ओक, तालुका कोषाध्यक्ष साईनाथ कळझुणकर, दाभोळ पॉवर कंपनीचे संचालक कुबेर डेक्कनवार, महाराष्ट्र पॉवर कॉर्पोरेशनचे सल्लागार हेमंत महाजन, अभियंता निखिल तलाठी, यश मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल दापोलीचे सागर भदे, आदित्य वराड आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg