loader
Breaking News
Breaking News
Foto

उद्धव ठाकरे देखील विद्यार्थी आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी जंतर-मंतर वर जाणार ,सरकार ची भूमिका महत्वाची ठरणार

मुंबई : कॉक्रोज जनता पार्टीचे आंदोलन आता आणखी तीव्र होताना दिसत आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्या जंतर-मंतर येथे जाणार आहेत. विरोधी पक्षातील सर्व प्रमुख नेते जंतरमंतरवर उद्या पोहोचत आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था अधिक कडक आली आहे . सरकार आंदोलन तीव्र होण्यापूर्वी चर्चा करू तोडगा काढेल अशा हालचाली सुरु आहेत .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काल झालेल्या आंदोलनानंतर आज अनेक नेत्यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी जंतरमंतरवर जाऊन अभिजीत दीपके यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकारचा जोरदार निषेध केला. तसेच हे सरकार विद्यार्थ्यांच्या विरोधात असल्याचा आरोप राऊत यांनी केला. राऊत यांनी आंदोलकांची भेट घेतल्यानंतर उद्या उद्धव ठाकरे जंतरमंतरवर जाणार आहेत. आदित्य ठाकरेही सोबत असणार असल्याचं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरे उद्या आंदोलकांना पाठिंबा देणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

टाइम्स स्पेशल

दरम्यान कॉक्रो जनता पार्टीच्या सुरू असलेल्या सोशल मीडिया साईटवर बंदी घालण्यात आली आहे याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे, आम्हाला त्यात ओढू नका असे म्हटले आहे. सोशल मीडिया वरून मोठ्या प्रमाणात कॉक्रोज जनता पार्टीला पाठबळ मिळताना दिसत आहे. यापूर्वीच कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई झाली असती तर ही स्थिती निर्माण झाली नसती असे सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांना वाटते आहे.उद्या उद्धव ठाकरे राजधानी दिल्लीत जंतर-मंतरवर आंदोलन ठिकाणी जाणार आहे, आज शरद पवार देखील जंतर-मंतरवर गेले आणि त्यांनी अभिजीत दीपकेची भेट घेतली, सोशल मीडियावर काही विरोधकांनी केलेल्या विधानामुळे या आंदोलनाला सुरुवातीला मोठा प्रतिसाद लाभला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg