loader
Breaking News
Breaking News
Foto

कुणकेश्वर तळेवाडी परिसरात अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणार्‍या दोन टेम्पोंवर महसूल विभागाची कारवाई

देवगड : तालुक्यातील कुणकेश्वर तळेवाडी परिसरात समुद्र किनार्‍यावरून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणार्‍या दोन टेम्पोंवर महसूल विभागाने कारवाई केली. ग्रामस्थांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे ही कारवाई शक्य झाली असून दोन्ही वाहने महसूल विभागाच्या ताब्यात घेण्यात आली आहेत. समुद्रकिनार्‍यावरील वाळूचा बेकायदेशीर उपसा व वाहतूक सुरू असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित वाहनांचा पाठलाग करून ती पकडली. त्यानंतर ही वाहने महसूल विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कुणकेश्वर परिसरात अवैध वाळू उपसा व वाहतुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची चर्चा असून, यापूर्वीही अशा घटनांबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, यावेळी ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे वाळू चोरीचा प्रकार प्रत्यक्ष उघडकीस आला. तलाठी ए. जी. नाईक यांनी दोन्ही वाहने ताब्यात घेत पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. समुद्र किनार्‍यावरील बेकायदेशीर वाळू उपशामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg