loader
Breaking News
Breaking News
Foto

सुकेळीजवळ मुंबई-गोवा महामार्ग जलमय; वाहनांच्या लांबच लांब रांगा

संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - मुंबई गोवा महामार्गावर सततच्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले असून नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी गावाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आणि अनेक वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी गावाजवळ मोरवीच्या अनागोंदी कारभारामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले. त्यामुळे महामार्ग जलमय झाला असून वाहनांच्या तीन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या. परिणामी प्रवाशांना अनेक तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. दरम्यान, महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असतानाही एका कार चालकाने वाहन पाण्यातून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने कार मध्येच अडकून पडली. सुकेळी येथील ऐनघर ग्रामपंचायतीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते मनोहरभाई सुटे तसेच स्थानिक ग्रामस्थांनी तत्परता दाखवत कार सुरक्षितपणे बाहेर काढली. त्यांच्या या मदतकार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.

टाईम्स स्पेशल

मुसळधार पाऊस कायम असल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अथक प्रयत्न केल्यानंतर काही तासांनी मार्ग खुला करण्यात आला. सुकेळी परिसरात वारंवार निर्माण होणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg