loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूल खेडमध्ये महाकवी कालिदास दिन उत्साहात साजरा

खेड (प्रतिनिधी) - रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलमध्ये दिनांक 15 जुलै रोजी महाकवी कालिदास दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महाकवी कालिदास यांच्या साहित्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून देणे, संस्कृत भाषेबद्दल आवड निर्माण करणे, तसेच भारतीय संस्कृती, साहित्य आणि अभिजात वारशाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनात रुजविणे हा महाकवी कालिदास दिन साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश आहे. कार्यक्रमाची सुरुवात महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर शाळेतील संस्कृत विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना महाकवी कालिदास यांच्या जीवनकार्याचा तसेच 5 प्रमुख अजरामर साहित्यकृतींचा परिचय करून दिला. तसेच संस्कृत भाषेचे महत्त्व आणि महाकवी कालिदास यांचे भारतीय साहित्यविश्वातील अमूल्य योगदान याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी संस्कृत श्लोकांचे सस्वर पठण केले. रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी महाकवी कालिदास दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg