loader
Breaking News
Breaking News
Foto

कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या आरक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे सिनेट सदस्य सुनील दळवी यांचा विद्यापीठाच्यावतीने सत्कार

खेड (प्रतिनिधी) - कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना शासन दरबारी ४० टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्यावतीने विद्यापीठाचे सिनेट सदस्य सुनील दळवी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली येथे आयोजित कार्यक्रमात दळवी यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या वेळी उपस्थित मान्यवरांनी कृषी अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना शासन सेवेत आरक्षण मिळण्यासाठी दळवी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक केले. यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, कृषी अभियांत्रिकी पदवीधारक विद्यार्थ्यांच्या दीर्घकालीन मागणीला न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रभावी पाठपुरावा करण्यात आला. त्यातून विद्यार्थ्यांना ४० टक्के आरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, यामुळे कृषी अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमास विद्यापीठातील विविध विभागांचे अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी तसेच कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांनी सुनील दळवी यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg