चिपळूण : संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमी व नगरपंचायत देवरुख तायक्वांदो क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने, रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या अंतर्गत ओमेगा गार्डन हॉल, सावरकर चौक, देवरुख येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो क्युरोगी व पुमसे स्पर्धा २०२६ मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत चिपळूण तालुक्याच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सर्वाधिक सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला.
विविध वयोगटांमध्ये खेळाडूंनी दमदार कामगिरी करत चिपळूण तालुक्याला अजिंक्यपद मिळवून दिले. या उल्लेखनीय यशाबद्दल रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेशराव कररा, उपाध्यक्ष संजय सुर्वे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तसेच जिल्हा पंच प्रमुख भरत कररा तसेच प्रवीण आवळे, रोहित शिंदे यांनी सर्व विजेत्या खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांचे अभिनंदन करून पुढील राज्य व राष्ट्रीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
चिपळूण तालुक्याचे प्रशिक्षक अर्जुन कलकूटकी, महेंद्र काणेकर, रुद्र जंगम, समीक्षा कदम, शादाब अडरेकर, हेरंभ शिर्के, साहिल मुरुडकर, आकाश जाधव आणि भूमी कदम, यांच्या अथक परिश्रमामुळे तालुक्यातील तायक्वांदो क्षेत्र अधिक बळकट होत असून, भविष्यातही राज्य व राष्ट्रीय स्तरावर चिपळूणचे खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. चिपळूण तालुक्याच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात ही कामगिरी अभिमानास्पद मानली जात आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.