संगलट (इक्बाल जमादार) - रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुंडलिका आणि महिसदरा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रोहा तालुक्यातील बाहे-देवकान्हे हद्दीतील एस. पी. फार्म येथे सहलीसाठी आलेले २० पर्यटक आणि दोन केअरटेकर असे एकूण २२ जण पुराच्या पाण्यात अडकले होते. मात्र सागर डहिंबेकर यांच्या एसव्हीआरएसएस रेस्क्यू टीमने आणि बाहे गावातील तरुणांनी वेळेत धाव घेत सर्वांची सुखरूप सुटका केली.
रविवारी सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे महिसदरा नदीला अचानक पूर आला. नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने एस. पी. फार्मचा परिसर चारही बाजूंनी पाण्याने वेढला गेला. त्यामुळे तेथे पर्यटनासाठी आलेले पर्यटक बाहेर पडू शकले नाहीत. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी सागर डहिंबेकर यांच्या एसव्हीआरएसएस रेस्क्यू टीमशी संपर्क साधला. माहिती मिळताच रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. बाहे गावातील स्थानिक तरुणांच्या सहकार्याने नियोजनबद्ध पद्धतीने बचाव मोहीम राबविण्यात आली. वेगवान पावसाचा आणि पुराच्या पाण्याचा सामना करत एकामागोमाग एक अशा सर्व २२ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
टीमच्या प्रसंगावधान, धाडस आणि कौशल्यामुळे कोणतीही जीवितहानी न होता बचावकार्य यशस्वी झाले. सुटका झाल्यानंतर पर्यटकांनी सुटकेचा निःश्वास सोडत एसव्हीआरएसएस रेस्क्यू टीम आणि स्थानिक तरुणांचे मनापासून आभार मानले. ग्रामस्थांनीही टीमच्या तत्परतेचे आणि धाडसी कार्याचे कौतुक केले. दरम्यान, रोहा तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून कुंडलिका, महिसदरा तसेच अन्य नद्या दुथडी भरून वाहत आहेत. प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना नदीकाठ, धबधबे तसेच पूरग्रस्त भागांमध्ये जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. हवामानाचा इशारा लक्षात घेऊन सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.