loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड आंबये गावात उबाठाला धक्का; उबाठा शाखाप्रमुख मंगेश सकपाळ यांचा सहकाऱ्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील आंबये गावातील उबाठाचे शाखाप्रमुख मंगेश सकपाळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह उबाठा पक्षाला राम राम करत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. खेड तालुक्यातील जामगे येथे आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करत, "शिवसेना ही सामान्य जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध असलेली संघटना आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पक्षात दाखल झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू. विकासकामांमध्ये कोणतीही कमतरता भासू देणार नाही," असा विश्वास व्यक्त केला. या पक्षप्रवेशावेळी मंगेश सकपाळ यांच्या सोबत चंद्रकांत पालकर,रुपेश सपकाळ, विलास सकपाळ, कृष्णा सकपाळ, रवींद्र धोत्रे, मयूर सुतार,संतोष सुतार, संभाजी धोत्रे, महेंद्र धोत्रे, नामदेव दयाळकर, शिवाजी दयाळकर, प्रथमेश गोसावी मकरंद सकपाळ, यश सकपाळ यांचेही शिवसेनेत स्वागत करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमास शिवसेना तालुका प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, पंचायत समिती सदस्य संग्राम कदम, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. पक्षप्रवेशामुळे आंबये गावात शिवसेनेची ताकद आणखी वाढली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg