loader
Breaking News
Breaking News
Foto

आंजर्ले दुर्घटनेत दोन बोटींची राख : मासेमारी बोटींना लागलेली आग स्थानिकांच्या एकजुट प्रयत्नाने विझली,, दापोलीतील अग्निशमन दल पुन्हा चर्चेत

दापोली :- तालुक्यातील आंजर्ले तरीबंदर येथे ग्रामपंचायतीजवळ पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बोटींना रात्री लागलेली आग अखेर स्थानिकांच्या मदतीने आटोक्यात आली. स्थानिक नागरिकांनी आणि मच्छीमारांनी जेसीबीच्या साहाय्याने शेजारील बोटी तातडीने बाजूला करून आग आणखी पसरू दिली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या आगीत दोन बोटी जळून खाक झाल्या असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, नेहमीप्रमाणे उशिराने का होईना, खेड येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, तोपर्यंत स्थानिक नागरिकांनी स्वतःच्या प्रयत्नांनी आग मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आणली होती.

टाइम्स स्पेशल

या घटनेने पुन्हा एकदा दापोली तालुक्यात स्वतंत्र आणि सुसज्ज अग्निशमन यंत्रणेची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. दापोली तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा तालुका असून येथे मच्छीमारी बंदरे, पर्यटनस्थळे, हॉटेल व्यवसाय आणि वाढती लोकवस्ती आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक आपत्कालीन घटनेसाठी दापोली तालुक्याला खेड येथील अग्निशमन दलावर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे दापोली तालुक्यासाठी तातडीने आधुनिक अग्निशमन केंद्र व अग्निशमन बंब उपलब्ध करून देण्याची गरज असून, याबाबत प्रशासनाने गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी नागरिकांची मागणी पुन्हा एकदा जोर धरीत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg