loader
Breaking News
Breaking News
Foto

सात वर्षीय मूर्तिकार कुशल जाधवने घेतले प्रसिद्ध मूर्तिकार अरुण दत्ते यांच्याकडून मूर्तिनिर्मितीचे धडे

पनवेल : नवीन पनवेलमधील सात वर्षीय बालमूर्तिकार कुशल अमित जाधव याने नुकतीच मुंबईतील प्रसिद्ध मूर्तिकार अरुण दत्ते यांच्या परळ येथील कार्यशाळेला भेट दिली. यावेळी त्याने मूर्तिनिर्मितीच्या विविध तांत्रिक बाबी आणि कलात्मक बारकावे जाणून घेतले. मुंबईतील प्रसिद्ध आणि नाविन्यपूर्ण मूर्तिकार अरुण दत्ते हे आपल्या जिवंत भासणाऱ्या तसेच वैशिष्ट्यपूर्ण गणेश व देवीच्या मूर्तींसाठी देशभर ओळखले जातात. पारंपरिक शिल्पकलेला आधुनिक कल्पकतेची जोड देत त्यांनी अनेक आगळ्यावेगळ्या संकल्पना साकारल्या आहेत. २०२५ मध्ये त्यांनी घडविलेली ‘परेलचा महाराज’ गणेशमूर्ती विशेष चर्चेचा विषय ठरली होती. ‘बॅलन्स कॉन्सेप्ट’वर आधारित या मूर्तीकडे पाहताना ती जणू गुरुत्वाकर्षणाच्या नियमांनाच आव्हान देत हवेत तरंगत असल्याचा भास होत होता. या अद्वितीय कलाकृतीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. तसेच भारतीय शिल्पकलेतील नावीन्यपूर्ण प्रयोगाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून देशभरातून तिचे कौतुक करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याच प्रसिद्ध मूर्तिकार अरुण दत्ते यांच्या परळ येथील कार्यशाळेत नवीन पनवेलमधील मूर्तिकार कुशल अमित जाधव याने भेट घेतली. मूर्तीकलेची आवड आणि शिकण्याची जिद्द असलेल्या कुशलने दत्ते यांच्याकडून मूर्तिनिर्मितीच्या विविध तांत्रिक बाबी, संकल्पना आणि कलात्मक बारकावे यांची अभ्यासपूर्ण माहिती घेतली. कुशलची कला, जिज्ञासा आणि शिकण्याची तळमळ पाहून अरुण दत्ते यांनी त्याचे मनापासून कौतुक केले. तसेच भविष्यात उत्कृष्ट मूर्तिकार होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करत त्याला सातत्याने सराव, निरीक्षण आणि नाविन्यपूर्ण विचार करण्याचा सल्लाही दिला.

टाईम्स स्पेशल

अरुण दत्ते यांनी अनेक वर्षांपासून विविध प्रकारच्या आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती साकारत शिल्पकलेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘परेलचा महाराज’ ही त्यांची ‘बॅलन्स कॉन्सेप्ट’वरील कलाकृती केवळ गणेशमूर्ती नसून भारतीय कलाकारांच्या अमर्याद कल्पकतेचा, सर्जनशीलतेचा आणि कलात्मक कौशल्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखली गेली. या प्रेरणादायी भेटीद्वारे कुशल अमित जाधवला देशातील आघाडीच्या मूर्तिकाराकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन घेण्याची संधी मिळाली. या भेटीमुळे त्याच्या मूर्तिकलेच्या प्रवासाला नवी दिशा मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg