रत्नागिरी (वार्ताहर): नाबार्डचा पंचेचाळीसावा स्थापना दिवस कृषी विज्ञान केंद्र लांजा येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिला शेतकरी, लघू उद्योजिका, फार्मर प्रोड्यूसर कंपन्या व स्वयंसहाय्यता समूहांना प्रशस्तीपत्र सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, आत्माचे उप प्रकल्प संचालक सायली फासके, बँक ऑफ इंडियाचे अग्रणी बँक व्यवस्थापक दर्शन कानसे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक महेश टिळेकर, लांजा कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. आनंद हणमंते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एजीएम प्रदीप पाटील, तालुका कृषी अधिकारी अभिजित शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय मंडळ कृषी अधिकारी कैलास शिंदे ,कृषि शास्त्रज्ञ डॉ.संदीप कांबळे, माविमच्या समन्वयक समृद्धी विचारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. आनंद हणमंते यांनी भूषविले. प्रास्ताविक नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक महेश टिळेकर यांनी केले.
कार्यक्रमात जिल्हास्तरीय भात पीक स्पर्धेत दुसरा क्रमांक प्राप्त खानू गावच्या महिला शेतकरी मीनाक्षी बबन कांबळे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या लाभार्थी व खानवली गावातील कष्टाळू लघू उद्योजिका मंजिरी मनोहर पाटकर यांचाही यावेळी प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. लांजा तालुक्यातील वेरळ गावच्या शेतकरी व पोल्ट्री काजू व्यावसायिक रश्मी रवींद्र साळवी यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. रश्मी साळवी कुक्कुटपालन व्यवसाय करतात. कार्यक्रमात वासिकबाबा महिला स्वयंसहाय्यता समूह गवाणे व श्रेय महिला उत्पादक गट विरगाव उपळे या स्वयंसहाय्यता समूहांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात आले.
नाबार्ड अनुदानित कंपन्या लांजा तालुक्यातील फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे चेअरमन आनंद कांबळे यांचा तर राजापूर तालुक्यातील राजंगा फार्मर प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन गोपाळ गोंडाळ व कार्यकारी अधिकारी गणेश जानस्कर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवकुमार सदाफुले, आत्मा उप प्रकल्प संचालक सायली फासके, अग्रणी बँक व्यवस्थापक दर्शन कानसे, कृषि विज्ञान केंद्राचे डॉ.आनंद हणमंते यांची भाषणे झाली. मान्यवर अधिकाऱ्यांनी कृषि विभागाच्या योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य प्रामाणिकरण नियामक मंडळ सदस्य डॉ संदीप कांबळे यांनी केले. कार्यक्रमाला शेतकरी महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.