loader
Breaking News
Breaking News
Foto

अखिल दाभोळखाडी भोई समाजाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न

वरवेली (गणेश किर्वे) - अखिल दाभोळखाडी भोई समाज, जिल्हा रत्नागिरी या नोंदणीकृत संस्थेच्यावतीने आणि शै. सां. क्रिडा समितीच्या व्यवस्थापनाखाली समाजाचे विद्यमान अध्यक्ष शांताराम य. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक वर्ष, २०२५-२६ वर्षासाठीचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन शिबिर मांटुगा, मुंबई येथे संपन्न झाले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचा भविष्याचा वेध घेणारं 'यशाची गुरुकिल्ली' हे करिअर मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमस्थळी संपन्न झाले. शिक्षणतज्ञ व करिअर मार्गदर्शक समर्थ पालकर यांनी विविध प्रचलित व आधुनिक अभ्यासक्रमांविषयी माहिती देऊन, भविष्यातील देशांतर्गत व परदेशस्थ संधीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले‌. साधारण दिड तासांपेक्षा जास्त वेळ पार पडलेले हे सादरीकरण विद्यार्थ्यांनी अतिशय एकाग्रतेने व शांतचित्ताने ऐकून घेतले. एकंदर करिअर मार्गदर्शन शिबिराच्या निमित्ताने पालकर सरांनी भविष्यातील कल्पनेपलीकडील संधीची महाद्वार समाजातील विद्यार्थ्यांसाठी खुलं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यादरम्यान उपस्थित, पदविका, पदवी, पदव्युत्तर उत्तीर्ण विद्यार्थी एकूण २८, बारावी उत्तीर्ण विद्यार्थी एकूण ५८ आणि दहावी उत्तीर्ण विद्यार्थी एकूण ७७ असे एकुण १६३ गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यकमादरम्यान, उपस्थित राहिलेले विद्यार्थी, पालकवर्ग, गाव/सातगाव पदाधिकारी, समाजबांधव तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या शै. सां. क्रीडा समितिच्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे समाजकार्यकारिणीच्यावतीने समाज अध्यक्ष शांताराम य‌. जाधव यांनी आभार मानले आणि अभिनंदनही व्यक्त केले. या कार्यक्रमाचे युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात आले होते. समाजातील साधारण १५०० युजर्स नी हा कार्यक्रम घरी बसून पाहिला.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रम प्रसंगी विशेष उपस्थिती :समाज अध्यक्ष शांताराम जाधव, उपाध्यक्ष मुरलीधर खडपेकर, समाजाचे प्रमुख मार्गदर्शक आर. आर. जाधव, खजिनदार प्रभाकर दिवेकर, समाज कार्यकारिणी सदस्य- सदानंद दिवेकर, जनार्दन जाधव, सल्लागार- कृष्णा महाकाळ, सदस्या सायली कांबरे, गोवळकोट सातगाव विभाग अध्यक्ष विजय दिवेकर, सहसचिव सुशिल लवंदे,गांग्रई सातगाव विभागाचे अध्यक्ष संतोष पावसकर, व सचिव जितेंद्र जाधव, कारुळ सातगाव विभागाचे अध्यक्ष दिनेश पडवळ व सचिव विश्वनाथ जाधव, अंजनवेल सातगाव ग्रामीण विभागाचे अध्यक्ष अनिल खडपेकर, महिला समिती अध्यक्षा जयश्री सैतवडेकर, माजी समाज कार्यकारिणी सदस्य- दिपक पारधी, सुनिल कासेकर, समाजसेवक रविंद्रनाथ निगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg