loader
Breaking News
Breaking News
Foto

एल.टी.टी. स्कूलच्या विद्यार्थ्यांचे इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत सुयश

खेड (प्रतिनिधी) : खेड येथील खेड लायन्स एज्युकेशन सोसायटी संचलित एल टी. टी. इंग्लिश मिडिअम स्कूल अँड ज्यु. कॉलेज, खेड या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या वर्षात घेण्यात आलेल्या इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. सदर परीक्षेत कु. प्राची सचिन काळे, कु. प्रसाद रतिश धामणकर, कु. प्राजक्ता महादेव केळकर, कु. वेदिका प्रमोद मोरे, कु. स्तुती विनायक जैन, कु. सिद्धी जनार्दन जाधव या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष अहमदभाई मुकादम, परवेज मुकादम, जयेश गुहागरकर, प्रेमळ चिखले, चंद्रकिरण वैद्य, पुष्कर नेणे, विलीन पाटणे, माजीद खतीब, समन्वयक सेबास्टियन जॉय, समन्वयक एल्सी जॉय, मुख्याध्यापक जी. बी. सारंग, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका पी. एस. कुडाळकर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यशवंत विद्यार्थ्यांना प्रशालेतील सहा. शिक्षिका जागुष्टे, कांचनकोटी, जाधव मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. सदर विद्यार्थ्यांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg