loader
Breaking News
Breaking News
Foto

घोगरे जाखिनवाडी येथे दरड कोसळल्याने खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी तातडीने कामांना सुरुवात

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घोगरे जाखिनवाडी येथे दरड कोसळून विद्युत वाहिन्यांचे नुकसान झाल्याने परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाशी समन्वय साधून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी तातडीने दुरुस्तीच्या कामांना सुरुवात करण्यात आली. या सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी शिवसेना तालुकाप्रमुख तथा रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे यांनी केली. यावेळी अधिकाऱ्यांशी चर्चा करून वीजपुरवठा शक्य तितक्या लवकर सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये तसेच काम सुरक्षित आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे, याबाबतही संबंधित यंत्रणेला मार्गदर्शन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पाहणीवेळी विभागप्रमुख श्रीकांत शिर्के, भरत महाडीक, श्रीराम कदम आणि बलिराम निकम हे उपस्थित होते. स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याबाबत आश्वस्त करण्यात आले. मुसळधार पावसामुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित दिलासा मिळावा आणि मूलभूत सेवा अखंडित राहाव्यात, यासाठी प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधून पाठपुरावा सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg