loader
Breaking News
Breaking News
Foto

मौजे दापोलीकर तब्बल ५ दिवसांपासून काळोखात; खंडित वीज पुरवठा सुरू करण्यासाठी महिलांची महावितरण कार्यालयावर धडक

दापोली (प्रतिनिधी) : दापोली शहराला अगदी लागूनच असलेल्या मौजे दापोलीतील खंडीत विज पुरवठा तब्बल ५ दिवस उलटून गेले तरी तो पूर्ववत करण्यात येत नसल्याच्या कारणाने अखेर संतापलेल्या मौजे दापोलीतील समस्त महिलावर्गाने विद्युत महावितरण कंपनीचे कार्यालय गाठले. मात्र आपली कैफियत ऐकून घेऊन उत्तर देईल असा एकही जबाबदार अधिकारीच कार्यालयात उपलब्ध नसल्याने अखेर संतापलेल्या महिलांना परत माघारी फिरावे लागले. हे विदयुत महावितरण कंपनीचे अपयश म्हणावे लागेल. तालुका ठिकाणाचे मुख्यालय असलेल्या दापोली शहराला अगदी लागूनच असलेल्या मौजे दापोली या महसुली गावात गेल्या ५ दिवसांपासून विज पुरवठा खंडित आहे. विदयुत महावितरण कंपनीच्या कार्यालयात मौजे दापोली येथून साद मारली तरी ऐकू जाईल, असे हे मौजे दापोली हाकेच्या अंतरावरील एक गाव आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मौजे दापोली गावात तब्बल ५ दिवस विज पुरवठा खंडीत आहे. विदयुत खंडीत प्रकाराच्या समस्येने त्रस्त झालेल्या मौजे दापोलीतील समस्त महिलांनी आपल्या मौजे दापोली महिला मंडळ अध्यक्षा संजना संतोष भुवड यांच्या मार्गदर्शनाखाली भारती म्हसकर, आरती म्हसकर, सुलभा बुरटे, संजना भुवड, गिता गावडे, अर्चना म्हसकर आदींसह महिला मंडळाच्या सदस्यांनी दापोली येथील विदयुत महावितरण कंपनी चे कार्यालय गाठले. तेथे आपली समस्या सांगू, विज खंडीत प्रकाराने होणारा त्रास सांगू, खंडीत विदयुत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी काही मदत हवी असेल तरी ती करू असे सांगू मात्र मौजे दापोली येथील महिलांची कैफियत ऐकून घेईल, असा एकही जबाबदार अधिकारीच कार्यालयात जाग्यावर उपलब्ध नव्हते. आता येतील नंतर येतील या आशेवर महिला बराच वेळ विद्युत महावितरण कंपनीच्या कार्यालयाठिकाणी थांबून राहील्या. मात्र अधिकारीच समस्या ऐकून घेण्यासाठी उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे महिलांची निराशा झाली. आणि त्यांना परत माघारी फिरावे लागले.

टाईम्स स्पेशल

ही त्यांची निराशा म्हणजेच विद्युत महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा कळस आहे. विदयुत बिल भरण्यासाठी काही कारणास्तव राहून गेले वा विलंब झाला तर दयामाया न दाखवता वा ऐकून न घेता विज पुरवठा खंडीत केला जातो. मग दयामाया न दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांना खंडीत विज प्रकारची जबाबदारी घ्यावी असे वाटत नाही काय? गावात रहिवाशांकडे असणारी आणि विजेवर चालणारी संयंत्र पुर्णपणे बंद पडली आहेत. सगळ्यांकडेच काही इन्व्हर्टर नाहीत. सध्या राॅकेल मिळत नाही त्यामुळे रात्री अंधारातच काढाव्या लागत आहेत. ही सारी परिस्थिती लक्षात घेवून झालेल्या तोटयाला जबाबदार राहून विदयुत महावितरण नुकसान भरपाई ची जबाबदारी घेणार आहे का ? याचे उत्तर महावितरण कंपनीला दयावेच लागेल. अशा या प्रकारामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg