loader
Breaking News
Breaking News
Foto

उत्कृष्ट कामगिरीबद्दल वेरळचे पोस्टमास्तर रियाज तडवी यांचा गौरव

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील वेरळ शाखा पोस्ट कार्यालयाचे पोस्टमास्तर रियाज खलील तडवी यांनी टपाल विभागाच्या ’टॉप अचिव्हमेंट इन नॅशनल बिल पे’ या उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय स्तरावर मानाचा पुरस्कार पटकावला. उत्तर रत्नागिरीसाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र चिपळूण डाक विभागाच्या लोकार्पण सोहळ्यात त्यांना गोवा पणजी परिक्षेत्राचे पोस्टल सेवा संचालक रमेश पांडुरंग पाटील यांच्या हस्ते पदक, प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. रियाज तडवी यांनी वेरळ शाखा पोस्ट कार्यालयामार्फत पोस्टल लाईफ इन्शुरन्स आणि नॅशनल बिल पे सेवांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत ग्राहकांना प्रभावी सेवा दिली. त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत टपाल विभागाने त्यांचा विभागीय स्तरावरील पुरस्काराने गौरव केला. ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या पोस्टमास्तराने केलेल्या या उल्लेखनीय यशामुळे खेड तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg