loader
Breaking News
Breaking News
Foto

किरकोळ दूध विक्रेत्यांनी दर वाढवले मात्र उत्पादन करणारा शेतकरी अजूनही आशेवर!

प्रकाश चाळके/देवळे : सध्या आय. ए.एस. अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या धाडसत्रामुळे सर्वच र्भेसळखोर धास्तावले आहेत. अनेक कृत्रिम दूध उत्पादन करणारे भेसळधारी बडी बडी धेंडे तुकाराम मुंडे यांच्या रडारवर आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे सर्वच खाद्यपदार्थ उत्पादन करणाऱ्यांनी आपल्या पदार्थात योग्य पद्धतीने उत्पादन करण्यासाठी धडपड सुरू केली आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्राच्या इतिहासात अशी कधीच घटना घडली नव्हती एवढा सुंदर काम तुकाराम मुंढे यांच्या मुळे होत आहे. याचाच अनुभव दूध खरेदी दारना आला आहे .कारण भेसळयुक्त दूध कोणीही विकू शकत नसल्याने चांगलेच दूध खरीददांना मिळत आहे. या दुधाची किंमत पूर्वीपेक्षा दहा रुपये अधिक दराने शहरी भागात विकले जात आहे. मात्र हे दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याचे दूध अजूनही पूर्वीच्या दरात बडे डेअरी धारक खरेदी करत असून दूध ट्रेडिंग वाले पैसे कमवत असून शेतकऱ्याच्या हाती पहिलेच दर मिळत असल्याने नाराजी पसरली आहे.

टाइम्स स्पेशल

रानावनातून काट्याकुट्यातून ऊन पावसाची तमा न बाळगता गाई म्हशी चरुन आणून वासराच्या तोंडातून घरच्या मुलाबाळांच्या तोंडातून दूध काढून चार पैसे मिळावे म्हणून दूध धारक शेतकरी सकाळी संध्याकाळी दोन वेळ दूध संकलन केंद्रावर दूध घालायला जातो.तेथेही स्वच्छ व डिग्री आणि एस. एन. एफ. योग्य प्रकारचे उत्कृष्ट दर्जाचे दूध देऊन संस्थांमार्फत दर दहा दिवसांनी पैसे मिळवतो मात्र हे मिळणारे पैसे पूर्वीच्या दरात मिळत असून ट्रेडिंग करणारे मात्र या दुधावर प्रत्येक लिटरला दहा ते पंधरा रुपये अधिक मिळत आहेत. कारण दुधाची मागणी जास्त असून उत्पादन कमी असल्याने अर्थशास्त्रीय नियमाप्रमाणे जेव्हा मागणी वाढते आणि उत्पादन कमी असते अशा वेळेला त्या मालाची किंमत वाढत जाते. तसाच प्रकार आज दुधाच्या बाबतीत घडत असून ट्रेडिंग वाल्यांना पैसे मिळतात मात्र काबाडकष्ट करणाऱ्या व दुधाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती आजही पूर्वीच्या दराचे पैसे मिळत असल्याने शासनकर्त्यांनी याबाबत लक्ष घालून दूध धारक शेतकऱ्यांनाही ट्रेडिंग करणाऱ्या प्रमाणेच सरकारने दहा ते पंधरा रुपये अधिक दर द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.नेहमीच उत्पादन कमी आणि मागणी जास्त अशावेळी ट्रेडिंग करणाऱ्या व्यापाऱ्यांचा फायदा होतो. मात्र शेतकरी कायमच वंचित राहतो .आज दुधाचे दर ट्रेडिंग वाल्यांकडून वाढवले जात असून शेतकऱ्यांना मात्र त्याचा कोणताही फायदा होत नसल्याचे शेतकरी वर्गात बोलले जात आहे. याबाबत शासनाने शेतकरी वर्गाचाही विचार करून दुधाच्या दराबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg