loader
Breaking News
Breaking News
Foto

वनश्री पुरस्काराने गौरवलेल्या ज्योती कदम यांचा रोटरी क्लब खेडकडून सत्कार

खेड : राज्य शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा आणि मानाचा समजला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज "वनश्री पुरस्कार" जाहीर झाल्याबद्दल शिवतेज आरोग्य सेवा संस्था, खेडच्या अध्यक्षा ज्योती रामदासभाई कदम यांचा खेड तालुक्यातील जामगे येथे रोटरी क्लब खेड यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब खेडचे अध्यक्ष मंदार संसारे यांच्या समवेत डॉ. रियाज मुल्ला, बिपीन पाटणे, सचिन करवा, निरंजन दळी, डॉ. समीर मंडपे, डॉ. उपेंद्र तलाठी, डॉ. अनिल जोशी, लक्ष्मीकांत पटेल, सिद्धार्थ पाटणे, आदित्य गांधी, कुणाल पाटणे, तन्मय दळी आणि अमीर पाटणे यांनी ज्योती रामदासभाई कदम यांची भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव केला. तसेच त्यांच्या पुढील सामाजिक व पर्यावरणीय कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि लोकहिताच्या विविध उपक्रमांमधून ज्योती कदम यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर केला आहे. त्यांच्या या यशामुळे खेड तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचा गौरव वाढला असून, हा पुरस्कार समाजकार्यातील त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानाची पावती असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थितांनी ज्योती कदम यांच्या कार्याचे मनापासून कौतुक करत समाजसेवा, पर्यावरण संरक्षण आणि जनकल्याणाच्या क्षेत्रात त्यांनी पुढेही असेच प्रेरणादायी कार्य सुरू ठेवावे, अशा शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना सौ. ज्योती कदम यांनी रोटरी क्लब खेडच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानत हा सन्मान भविष्यात अधिक जोमाने समाजहिताचे कार्य करण्यासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे सांगितले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg