loader
Breaking News
Breaking News
Foto

सौ. ज्योती रामदास कदम यांना प्रतिष्ठेचा वनश्री पुरस्कार जाहीर

खेड, : राज्य शासनाचे अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाणारे २०२४चे छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये मंडणगड तालुक्यातील शिरगाव येथे विविध प्रजातींची तब्बल ४५ हजार वृक्षांची वनराई उभारणार्‍या ज्योती रामदास कदम यांना वनश्री पुरस्कार जाहीर झाला असून त्याच्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. कोकण विभागातून ज्योती कदम यांनी प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माजी मंत्री आणि ज्येष्ट नेते रामदास कदम यांच्या ज्योती कदम या पत्नी तर राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री आहेत. ज्योती कदम यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे मंडणगड तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याची प्रतिक्रिया व्यक्त होते आहे.

टाईम्स स्पेशल

मंडणगड तालुक्यातील सोवेली येथील सौ. ज्योती रामदास कदम यांंनी ’ज्योती निसर्ग बंधन वनराई’ या उपक्रमातून मंडणगड तालुक्यातील शिरगाव येथे गेल्या पाच वर्षांपासून फळ, वनझाडे, दुमिळ औषधी वनस्पतीसह तब्बल ४५ हजार वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण केला आहे. ज्योती कदम यांना हा पुरस्कार जाहीर होताच अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg