loader
Breaking News
Breaking News
Foto

मे महिन्यात मंडणगड तिडे गावातील हरवलेल्या इसमाचा दोन महिन्यांनी गळफास घेतलेल्या स्वरूपात आढळून आला सांगाडा

खेड (प्रतिनिधी) - मंडणगड तालुक्यातील लाटवण गावातील रहिवासी नारायण महादेव बर्वे (राहणार तिडे) हे दिनांक २ मे रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्याने बेपत्ता झाल्याची नोंद अविनाश बर्वे यांनी पोलिस ठाण्यात दिली होती. दिनांक १३ जुलै रोजी गळफास घेतलेल्या स्वरूपात त्यांचा सांगाडा भेटल्याने खळबळ उडाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिनांक १३ जुलै रोजी तिडे गावचे पोलिस पाटील रवींद्र पवार यांनी खबर देणार यांना सांगितले की बोरीचा माळ येथे जंगलात एका शिवणीच्या झाडाजवळ एका माणसाची कवठी व मानवी हाडे असून जवळच एका हिरव्या रंगाचा टी शर्ट पडलेला आहे. त्यामुळे तुम्ही येऊन बघा, असे सांगितल्यानंतर खबर देणार व त्यांचा चुलत भाऊ प्रथमेश रामचंद्र बर्वे त्या ठिकाणी गेले असता शिवणीच्या झाडाजवळ बरगड्यांची हाडे, बाजूला मानवी कवठी, चप्पल जोड, हिरव्या रंगाचा टी शर्ट, टोपी, काळया रंगाची हाफ पँट असे दिसून आले.

टाईम्स स्पेशल

तसेच शिवणीच्या झाडाला वेढा घातलेल्या एका वेलीच्या टोकाला गळफास लावल्याचे गुंडाळा फास दिसला. त्यावेळी खबर देणार यांची आपल्या वडिलांशी ओळख पटली. सदरची मानवी हाडे आपल्या वडिलांचीच असल्याची खात्री पटली. या घटनेची नोंद मंडणगड पोलिस ठाणे येते आकस्मित मृत्यू रजिस्टरमध्ये करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg